Lok Sabha Election Result 2024 Live Updates पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची झालेल्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत अजित पवार यांना धक्का बसेल, असा कल पहिल्या काही फेऱ्यांतून पुढे आला आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पहिल्या काही फेऱ्यांत मताधिक्य घेतले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज सातत्याने वर्तविला जात होता. मात्र मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांत सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही काही फेऱ्या बाकी असल्याने निवडणकीचा निकाल काय लागतो याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा निवडणुकीचा पदभार काढला
सुप्रिया सुळे या चौथ्या फेरी अखेर १९ हजार मतांनी पुढे आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीची सुळे आणि पवार यांच्यातील ही लढत पहिल्यापासूनच भावनिक ठरली होती. बारामती मध्ये वर्चस्व कोणाचे हे ठरविणारी ही निवडणूक ठरली होती. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानतर पहिल्या फेरीपासूनच सुळे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. चौथ्या फेरी अखेर सुळे यांचे मताधिक्य १९ हजारांनी वाढले होते.