लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (१ ऑगस्ट) दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Forest Minister Ganesh Naiks first visit to Vidarbha praise work of former Forest Minister
वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Disagreements in sports over government authority Controversy over highest sports award again
सरकारच्या अधिकारावरून क्रीडाक्षेत्रात मतभिन्नता; सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
MHADA, service fee, possession certificate,
म्हाडाच्या विजेत्यांना मोठा दिलासा, ताबापत्र मिळाल्यापासूनच सेवाशुल्क घेणार; थकबाकीचा आर्थिक भार कमी
Fort protection campaign at the foot of Sinhagad pune news
सिंहगडाच्या पायथ्याशी गडरक्षण मोहीम

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची चाळण, शहरात किती खड्डे?महापालिकेचा काय आहे दावा?

हेही वाचा – कात्रज येथून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता युवक, मनपा भवनलगत असलेल्या पुलाजवळ आढळला मृतदेह

या पुरस्काराचे यंदा ४२ वे वर्ष असून, एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणति टिळक लिखित ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश या कॉफी टेबल बुकमध्ये आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त डाॅ. रोहित टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader