लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळाच्या सत्रात चांगले मतदान झाल्याचे दिसते. सकाळी सात ते दुपारी एक या सहा तासात २७.१४ टक्के मतदान झाले.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
आणखी वाचा-मतदानामध्येही कोथरूड आणि कसब्यामध्ये चढाओढ!
त्यामध्ये कर्जतमध्ये सर्वाधिक २९.४७ टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये २६.९३ टक्के, उरणमध्ये २९.०६ टक्के, चिंचवड २६.१२ टक्के, पिंपरी २३.९६ टक्के आणि मावळ विधानसभा मतदारसंघात २८.०३ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत २७.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के,दुसऱ्या दोन तासात १४.८७ टक्के तर तिसऱ्या दोन तासात २७.१४ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.