राज्यभरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांच्या एकांकिका, शंभराहून अधिक लेखक, दिग्दर्शक आणि शेकडो कलाकार यांची गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षा आज, रविवारी संपली आहे. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत सादर झालेल्या पहिल्या एकांकिकेने सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदी झाली. लोकांकिका स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विल ऑफ द विसस, फोटू, मोटिव्ह, अनोल शलोम, चीन ची भिंत, बाउन्ड्रीच्या पलीकडे, एकांताची सुरुवात, बॉर्न १, अंतर, चिठ्ठी, रुह हमारी या एकांकिका पुण्यातील महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी सादर केल्या. पहिल्या प्राथमिक फेरीतून पुढील महाविद्यालये अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत. ही अंतिम फेरी ७ डिसेंबर २०१४ रोजी पार पडेल. यातून एका महाविद्यालयाची निवड मुंबईत होणा-या महाअंतिम फेरीसाठी करण्यात येईल. २० डिसेंबर २०१४ रोजी मुंबईत महाअंतिम फेरी पार पडेल.
पुणे विभागातून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिकाः
१. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स- रुह हमारी
२. स.प.महाविद्यालय- विल ऑफ द थिसस
३. मॉडर्न कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय- मोटिव्ह
४. आय्.एल्.एस्.लॉ कॉलेज- चिठ्ठी
५. मराठवाडा मित्रमंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स- फोटू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा