करीअर निवडण्यापासून ते निभावण्यापर्यंतच्या प्रवासात येणारी विविध वळणे पार करण्यासाठी तज्ज्ञांचा हात मिळणार आहे. करीअर निवडीबाबत सर्वागाने माहिती देणारा एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत  ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम मंगळवारी (८ डिसेंबर) पुण्यात होणार असून कार्यक्रमापूर्वी तासभर आधी प्रवेशिका मिळणार आहेत.
करीअरची निवड करताना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ‘रोबोमेट’ ही संस्था या उपक्रमासाठी सहप्रायोजक आहे. तीन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. कल चाचणी म्हणजे काय, ती कधी करावी, त्याच्या निष्कर्षांतून आपली वाट निश्चित कशी करावी अशा विविध मुद्दय़ांवर ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेच्या नीलिमा आपटे मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, त्याची प्रवेश प्रक्रिया, नवी क्षेत्र अशा विविध मुद्दय़ांवर प्रसिद्ध करीअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. अगदी दहावी, बारावीच्या परीक्षांचा ताण, प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना येणारा ताण, करीअरच्या निवडीनंतर त्या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देताना येणाऱ्या ताणाचा सामना कसा करावा या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके संवाद साधणार आहेत.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
कधी : मंगळवार (८ डिसेंबर), सायंकाळी ५ वाजता
कुठे : भरत नाटय़ मंदिर
प्रवेशिका कार्यक्रमाच्या ठिकाणी तासभर आधी मिळणार आहेत.

Story img Loader