‘दुग्धक्रांतीनंतर पुढे.’ विषयावर ‘लोकसत्ता’ आयोजित परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने काही वर्षांपूर्वी क्रांती घडविली. अगदी दुष्काळी भागातही दुधाचा महापूर वाहू लागला. मात्र, त्याने दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रातील सर्वच प्रश्न, समस्या सुटल्या नाहीत. याच प्रश्नांचा परामर्श घेण्याबरोबरच त्यावरील ठोस उपायांचा ऊहापोह ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये होणार आहे.

दुग्धक्रांतीनंतर पुढे.. या विषयावरील ‘लोकसत्ता कॉन्क्लेव्ह’मध्ये दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रातील समस्यांवर विचारमंथन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे पदाधिकारी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, अनुभवी व्यावसायिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या वेळी असेल. परिषद केवळ निमंत्रितांसाठी आहे.

दूध आणि संबंधित क्षेत्रासमोरची आजची आव्हाने कोणती, या आव्हानांवर उपाय काय, या आणि अशा विविध प्रश्नांचा मागोवा ‘लोकसत्ता कॉन्क्लेव्ह’च्या या नव्या पर्वात घेतला जाईल. दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील शेकडो व्यावसायिक तसेच खासगी आणि सहकारी दूध संघ उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांची कामगिरी उत्तम होत असली, तरीही दूध आणि संबंधित क्षेत्रासमोर अनेक समस्या आणि आव्हाने उभी आहेत. या समस्या आणि आव्हानांचा ऊहापोह करतानाच त्यावरील उपायांची चर्चाही ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta milk conclave 018
Show comments