लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर प्रचाराचे दोन अंक संपले. आता महापालिका निवडणुकीचा तिसरा अंक झाला की, पाच वर्षांसाठी प्रचारावर पडदा पडणार आहे. तिसऱ्या अंकासाठी पुण्यातील राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षरूपी नाटक कंपनी आणि त्यातील राजकीय कलाकार नव्या वर्षात पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आश्वासनांचे सोंग आणणार आहेत. महापालिकेच्या निवडणुका कधी होणार हे अधांतरी असताना पुण्यातील राजकीय पक्षांची सद्या:स्थिती कशी आहे? कोणी स्वान्तसुखाय, तर कोणी विजयाच्या उत्सवात. काहीजण मतदारांनी चपराक दिल्यावर सुन्न मन:स्थितीतून बाहेर पडेनासे झाले आहेत, तर काहींना नक्की कोणासाठी काम करतोय, याचे कोडे अजूनही सुटले नसल्याने भरकटलेल्या स्थितीत आहेत…

भाजप : विधानसभेच्या घवघवीत यशानंतर पुण्यातील भाजप सध्या विजयी उत्सवात असली, तरी सावध आहे. शहरात एक खासदार आणि सहा आमदारांनी विजयाची गुढी उभारल्यावर आनंदोत्सवाला आवर घालत लगेचच महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. त्याची सुरुवात सदस्य नोंदणीने करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांचे विभागनिहाय मेळावे सुरू झाले आहेत. त्यामुळे वरकरणी तरी भाजप ही महापालिका पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र दिसते. अर्थात हे शहाणपण लोकसभेत देश आणि राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आलेले आहे. विधानसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतलेल्या निवडणुकीने काम सोपे झाले; पण महापालिका निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुती म्हणून हा भाजपपुढे प्रश्न आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेवर एकहाती अंमल ठेवल्यानंतर आगामी काळात सत्तेत वाटेकरू नको, अशी पदाधिकाऱ्यांची धारणा आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे कोणाचे चालणार नसल्याने स्थानिक पदाधिकारी विवंचनेत पडले आहेत. शिवाय ऐन वेळी अन्य पक्षांतील ‘आयारामां’चे स्वागत करण्याची मनाची तयारीही करावी लागणार आहे.

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ लाख वृक्ष; महापालिकेचा दावा

राष्ट्रवादी (अजित पवार) : लोकसभेत फारसे हाती लागले नसले, तरी विधानसभेला शहर आणि जिल्ह्यात यश मिळवून ताकद दाखवून दिलेला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सध्या तरी महापालिका निवडणुकीचे काही सोयरसुतक नाही. विधानसभेची निवडणूक झाल्यावर राष्ट्रवादी आपल्याच आनंदात रममाण आहे. महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यापेक्षा महायुती म्हणून लढविल्या जाव्यात, अशी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सुप्त इच्छा आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने राज्यानंतर महापालिकेत सत्तेतील वाटेकरी होण्याची मनीषा हा पक्ष बाळगून आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष : विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने नाउमेद झालेला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष अजूनही ‘प्रचंड आशावादी’ भूमिकेत आहे. लोकसभेला थोडेफार यश आणि विधानसभेला पुण्यात एक आमदार निवडून आल्याने मनोमन खचलेला हा पक्ष अजूनही सावरलेला नाही. मात्र, अपयशानंतरही सातत्याने आंदोलनांच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम या पक्षाकडून सुरू आहे. ताकदवान सवंगडी सोडून गेल्याने नवे भिडू शोधण्याचे काम या पक्षाला करावे लागत आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा, विधानसभेला साथ सोडून गेलेले साथीदार पुन्हा हात पुढे करतील, अशी आशा बाळगून हा पक्ष कामाला लागला आहे.

हेही वाचा >>>राज्यातील या शहराला मिळेना अतिरिक्त आयुक्त!

काँग्रेस : देशात आणि राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली पुण्यातील काँग्रेस अजूनही सुधारण्याच्या मन:स्थितीत नाही. भरकटलेल्या काँग्रेसचा वारू पुन्हा मार्गावर आणण्यासाठी कप्तानच नाही. ऐन विधानसभा निवडणुकीत गटातटाचे राजकारण आणि बंडखोरी करून पक्षाला अपयशाच्या खाईत लोटल्यानंतरही हा पक्ष अजूनही कुरघोड्यांच्या राजकारणात अडकून पडला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. वेळ मिळालाच तर कोणी कोणाचा आदेश मानायचा, हा प्रश्न आहे. कारण, अजून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षही नेमता आलेला नाही.

शिवसेना (ठाकरे) : लोकसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला. हाती काही लागले नाही. विधानसभा निवडणुकीत तीच गत. तरीही निर्विकार अवस्थेत शिवसेना (ठाकरे) पक्ष पुणे शहरात निद्रिस्त अवस्थेत आहे. एके काळी ‘आव्वाज कुणाचा? म्हटल्यावर शहर हादरवून सोडणाऱ्या या पक्षाला प्रभावी नेतृत्व राहिलेले नाही. विधानसभा निवडणुकीत शहरात पक्षाचा उमेदवार उभा असतानाही उद्धव ठाकरे फिरकले नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय होणार, याचा अंदाज पक्षातील पदाधिकाऱ्यांना आतापासूनच आला आहे. त्यामुळे हळूहळू पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्यास सुरुवात झाली आहे. पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका येईपर्यंत किती शिलेदार राहतील, हे आगामी काळातच समजणार आहे.

शिवसेना (शिंदे) : पुण्यात शिवसेना (शिंदे) हा पक्ष एका विशिष्ट भागापुरते अस्तित्व राहिलेल्या अवस्थेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पाडू न शकलेला हा पक्ष आगामी महापालिका निवडणुकीतही आपली मर्यादित ताकद ओळखून आहे. पक्षाची ताकद विभागली गेल्याने प्रभावक्षेत्र असलेल्या भागातही अस्तित्व दाखविण्यासाठी या पक्षाला धडपड करावी लागत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची साथ मिळेल, यावर हा पक्ष कार्यरत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना : निवडणुका आल्या, की जोमाने कामाला लागणारी आणि निवडणुका झाल्यावर कोणीही ‘मनसे’ काम न करणारे पदाधिकारी, अशी पुण्यातील या पक्षाची स्थिती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या पक्षाचे अस्तित्व मतदारांना जाणवू लागते. तोपर्यंत हा पक्ष ‘मौनी’ अवस्थेत असतो. सध्या हा पक्ष याच स्थितीत आहे. विधानसभेत पक्ष क्षीण होत गेल्याचे मतदारांनी दाखवून दिले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यापलीकडे या पक्षाने अद्याप काहीही केलेले नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली या पक्षामध्ये दिसत नाहीत.

‘आरपीआय’, वंचित बहुजन आघाडी : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण नक्की कोणासाठी काम करतो, हे अद्याप न कळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुका आल्या, की मिळेल त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्यावर समाधान मानायचे, याच भूमिकेत हे दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या दृष्टीने या पक्षांकडून नियोजनाचा अभाव दिसतो. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले की, प्रचारासाठी या सगळ्यांची धावपळ होईलच. तोपर्यंतच्या मध्यंतरात पुणेकर तटस्थ भूमिकेत आहेत!

sujit. tambade@expressindia. Com

Story img Loader