‘सेट आला का. अमुक कुठे आहे. अशी सुरू असलेली लगबग, उदंड उत्साह, थोडीशी धाकधूक, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षां पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी.. अशा सळसळत्या तरुणाईच्या जल्लोषात ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदी रविवारी पुण्यातून झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नावीन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्टय़ ठरले. पुणे विभागीय अंतिम फेरीसाठी पाच संघांची निवड करण्यात आली असून ७ डिसेंबर रोजी ही फेरी रंगणार आहे.  

फोटो गॅलरी : नाटय़जागराची नांदी  

‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची सुरुवात पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीने रविवारी झाली. रंगतदार स्पर्धेतील चुरशीने स्पर्धकांची निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

विभागीय फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
*रूह हमारी, गरवारे वाणिज्य महाविद्यालय
*विल ऑफ द विशस, स. प. महाविद्यालय
*मोटिव्ह, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय
*चिट्टी, आयएलएस विधी महाविद्यालय
*फोटू, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय
स्पर्धेची माहिती आणि पुणे विभाग प्राथमिक फेरीचा निकाल indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika  या संकेतस्थळावर पाहता येईल.

संबंधीत बातम्या

– ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला पुण्यातून सुरुवात

– ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला सुरुवात

– तरूणाईच्या आविष्कारातून नवे पाहण्याची अन् शिकण्याची संधी

Story img Loader