जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमारा केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात पोलीस आणि सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे उपोषणास बसले होते. याच उपोषणादरम्यान पोलिसांनी तेथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर आणि नागरिकांवर लाठीमारा केला होता. या घटनेचा अवघ्या महाराष्ट्रातून निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्वकाही बंद असल्याचं निदर्शनास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा-गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात राडा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे. जालनामध्ये मनोज जरांगे हे मराठा बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषणासाठी बसले होते. जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हाच पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन समोरासमोर आले. पोलिसांनी मराठा बांधवांवर लाठीमारा केला. यामुळे अवघ्या महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या विविध भागात बंदची हाक देण्यात आली आहे. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोणावळ्यासह मावळात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व व्यवहार ठप्प होते. शाळा, कॉलेज आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आलं. सर्व स्तरातून जालन्यातील घटनेच्या निषेध करण्यात येत आहे.