जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात मास्क वापरण्याच आवाहन केले जात आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असून तिथे ख्रिसमस आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. पर्यटकांनी स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घेऊन मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे. तसेच,हॉटेलमध्ये पर्यटकांना मास्कची सक्ती करावी असे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोणावळा मुख्याधिकारी म्हणाले की, लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे नेहमी पर्यटकांची ये- जा असते. २५ तारखेला ख्रिसमस असल्याने तर ३१ डिसेंबरला नूतन वर्षाच स्वागत करण्यासाठी लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळावे आणि मास्कचा वापर करावा. हॉटेल चालकांनी देखील पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करावी .