पुणे: तळजाई टेकडी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चाेरट्यांना सहकारनगर पोलिसांनी गजाआड केले.गणेश अनंत काथवटे (वय २३), अमित बाबू ढावरे (वय २६, दोघे रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तळजाई टेकडी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत चोरटे असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी जून महिन्यात काथवटे, ढावरे यांच्या साथीदारांना पकडले होते. अंधाराचा फायदा घेऊन काथवटे आणि ढावरे पसार झाले होते. दोघांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. काथवटे बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार आणि किरण कांबळे यांना मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने सापळा लावून काथवटेला पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यानंतर ढावरे अरण्येश्वर परिसरातील घरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश मंडलिक यांना मिळाली. ढावरेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्याणी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहायक फौजदार बापू खुटवड, अमोल पवार, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पद्माळे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ, बजरंग पवार, खंडू शिंदे यांनी ही कारवाई केली.