पुणे : ‘इंटलेक्च्युअल’ (बुद्धीजीवी) लोकांनी मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे तुम्हाला इंटॅलिजंट म्हणून की इंटलेक्च्युअल, असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना केला. येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात ‘क्यूएस वर्ल्ड रेटिंग सिस्टिम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विन फर्नाडिस लिखित ‘इंडिया नॉलेज सुप्रिमसी – द न्यू डॉन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते गुरूवारी झाले. यावेळी कोश्यारी म्हणाले, की आपल्याला स्थिती, काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फक्त आपल्या प्राचीन काळातील वैभवाचा गौरव करून चालणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसऱ्यांचे कौतुक करत राहिलो तर आपण संपून जाऊ. भूतकाळापासून शिकावे, वर्तमानात जगावे आणि भविष्याकडे पहावे या पद्धतीने पुढे जायला हवे. भारतातील बुद्धिवंत विदेशात जाऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषवतात. त्याप्रमाणे आपल्या विद्यापीठांनाही जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पूर्वीच्या काळात आपला देश ज्ञानाच्या बाबतीत उत्कृष्ट होता. हे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वपूर्ण ठरेल. बुद्धिमान लोकांनी मुलांना संस्कार द्यावेत, देशाविषयी, मातृभाषेविषयी गौरव भावना निर्माण करावी. आपण ध्येय निश्चित करून काम केल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो.  सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, विद्यापीठाच्या डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमनी आदी या वेळी उपस्थित होते.