पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला असून, इच्छुकांना शनिवारपासून (१२ ऑक्टोबर) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत लाॅटरी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता अशोक भालकर, प्रभाही सह आयुक्त हिम्मत खराडे, तहसीलदार अभिजीत जगताप यावेळी उपस्थित होते. पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) ४७ सदनिका, कमी उत्पन्न गट (एलआयजी) प्रवर्गासाठी ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ३४७ सदनिका आणि एलआयजी प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ सदनिका उपलब्ध आहेत.

female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
woman tries suicide on railway station man helped her viral video on social media
माणुसकीला सलाम! तिचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वत:चा जीव धोक्यात टाकला; पुढच्याच क्षणी ट्रेन आली अन…थरारक VIDEO
Horror Movies On OTT (1)
हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल

हे ही वाचा…पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा चिंचवडमधील तरुण गजाआड, आरोपीकडून २५० बनावट नोटा जप्त

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांचा आकार २९.५५ चौरस मीटर असून सदनिकांची किंमत १५ लाख ७४ हजार ४२४ एवढी आहे. कमी उत्पन्न गटातील सदनिकांचे क्षेत्र ५९.२७ चौरस मीटर असून किंमत ३५ लाख ५७ हजार २०० एवढी निश्चित करण्यात आली आहे. परवडणारी घरे योजनेअंतर्गत सदनिकांचे क्षेत्र २५.५२ चौरस मीटर आणि किंमत २० लाख ९० हजार ७७१ एवढी तर, कमी उत्पन्न गटातील सदनिकांचा आकार ३४.५७ चौरस मीटर असून त्याची किंमत २८ लाख ३२ हजार २०८ एवढी आहे.

हे ही वाचा…झाडे तोडण्याबाबत पुन्हा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई, ‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’ने महापालिकेस फटकारले

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील सदनिकांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असून कमी उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांसाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी जीएसटीसह अर्ज शुल्क ७०८ रुपये भरावे लागणार आहेत. लाॅटरीची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे केली जाणार आहे. इच्छुकांना https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करता येणार आहे.