पुणे : चालू आर्थिक वर्षातील मिळकतकराची सर्व रक्कम ३१ जुलैपर्यंत भरणाऱ्यांसाठी लाॅटरी योजना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळणार आहेत. यामध्ये पाच पेट्रोल कार, पंधरा ई-बाईक, १५ मोबाइल फोन, लॅपटाॅप यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मिळकतकरांच्या देयकांचे वितरण करण्यात आले आहे. मिळकतकर भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. या मुदतीमध्ये कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये किमान पाच ते कमाल १० टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय निवासी, बिगरनिवासी आणि मोकळ्या जागांचा संपूर्ण मिळकतकर ३१ जुलैपर्यंत भरणाऱ्यांसाठी लाॅटरी योजना जाहीर करण्यात आली आहे. मिळकतकर भरण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मरणानेही छळले येथे; पुण्यातील स्मशानभूमींची अशी आहे अवस्था

पाच पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल संच, १० लॅपटाॅप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. लाॅटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नसून, केवळ मिळकतकर ३१ जुलैपर्यंत भरणे आवश्यक आहे, अशी माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ४०० हून अधिक बिगरनिवासी मिळकती सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकीदारांवर तीव्र कारवाई करण्यात येणार आहे, असे करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.