लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रेमसंबंधातून २२ वर्षाच्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून, तिला तेथे डांबून ठेवले आहे. तिने लोकेशन पाठविले असल्याची तक्रार एका तरुणीने केली होती. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून तरुणी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. तेव्हा दिल्लीत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीने अपहरण झाले नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तक्रार देणाऱ्या मैत्रिणीची चौकशी केली. तेव्हा मैत्रिणीने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले.

14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

एका तरुणीचे येरवडा भागात राहणाऱ्या सैफ नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याने विवाहाचे आमिष दाखवून २९ मे रोजी पळवून नेल्याची तक्रार तरुणीने तिच्या मैत्रीणीकडे केली होती. सैफ विवाहित असून त्याने मला फसविले असून, दिल्लीत डांबून ठेवल्याची तक्रार मैत्रिणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून केली होती, अशी तक्रार तरुणीच्या मैत्रिणीने पोलिसांकडे दिली होती. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला होता.

आणखी वाचा-VIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार

सैफ आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्लीत रवाना करण्यात आले. तांत्रिक तपासात दोघे जण नोएडा भागात असल्याची महिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबतची तक्रार मिळाल्यावर तातडीने दिल्लीला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे आणि कर्मचाऱ्यांचे पथक पाठविले. तेथे चौकशी केल्यावर हा सर्व उलघडा झाला. पुण्यात पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या तरुणीच्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध तुटले होते. तिचा प्रियकर तिला त्रास देत होता. तिने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. पोलिसांनी तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती पोलिसांवर चिडली होती. पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी तिने मैत्रिणीचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार दिली. पोलिसांचा विश्वास बसावा म्हणून तिने दिल्लीतील मैत्रिणीला काही न सांगता तिचे लोकेशन मागवून घेतले होते, असे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

Story img Loader