शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून संथ प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांपैकी निम्म्यापेक्षा कमी मुलांचे प्रवेश झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे युवतीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमध्ये प्रवेशासाठी एक लाख १ हजार ८४६ जागा उपलब्ध आहे. या जागांवर प्रवेशासाठी तीन लाख ६४ हजार ४१३ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रवेशाच्या निवड यादीसाठी पहिली सोडत काढण्यात आली असून, त्यामध्ये ९४ हजार ७०० मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ मेपर्यत मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेचा संथ वेग पाहता ३६ हजार ७५३ मुलांचे प्रवेशच निश्तिच करण्यात आले. ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. अनेक पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, प्रवेश घेण्यात अडचणी उद्भवत आहे. अशा परिस्थितीत उर्वरित मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांचे प्रवेश करण्यासाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी

प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम पहिल्या सोडतीनुसार ८१ हजार १२९ मुले प्रतीक्षा यादीत आहेत. निवड यादीतील मुलांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर, प्रतिक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळते. त्यावेळी पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यात येतात. मात्र, सध्याच्या प्रवेश प्रक्रियेचा वेग संथ असल्याने, प्रतिक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत.