पुणे : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागातर्फे १४ शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. मात्र, शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये विविध प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांना अर्ज करण्यासाठी २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शिष्यवृत्ती अर्ज सप्ताह राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा >>> मतदानासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज; ४३३३ पोलिसांचा तगडा बंदोबस्त

उच्च शिक्षणाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे अर्ज भरावा लागतो. या अनुषंगाने १४ शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज विशेष सप्ताहाचे आयोजन करून भरून घेण्याबाबत २७ सप्टेंबर रोजी परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय कमी अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर प्राप्त झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांना २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष सप्ताह राबवण्याची सूचना देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती योजनांसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी पुणे उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील शासकीय, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठांमध्ये १४ शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. विशेष मोहिमेसाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.