पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरू असताना अचानक घरगुती सिलिंडरने पेट घेतल्याची घटना घडली. पालखी सोहळ्यात बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सासवड-जेजुरी रस्त्यावर वाळुंज फाटा येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

हेही वाचा >>> विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…

Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
pink powder on los angeles
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी संत सोपानदेवांच्या सासवड येथून खंडेरायाच्या जेजुरीकडे मार्गक्रमण करत होती. त्यावेळी वाळुंज फाटा येथे  दिंडी क्रमांक ७८ मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तेथे असलेल्या वारकऱ्यांनी सिलिंडरवर वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखी सोहळ्यामध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेल्या सिलिंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला. युदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. वारकरी समुदायाने अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी अधिकारी आणि जवानांचे कौतुक केले.

हेही वाचा >>> ललित पाटील प्रकरणात पोलीस दलातील दोन कर्मचारी बडतर्फ, ललितला पळून जाण्यास दोघांनी ‘अशी’ केली मदत

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले आणि अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला. पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्षे आळंदी ते पंढरपूर अशा माउलींच्या पालखी सोहळ्यात आग आणि आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी आणि जवानांसह तैनात असते. अन्य महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्तासाठी असतात.

Story img Loader