पुणे : उद्योग, शेती, शिक्षणात अव्वल असलेले महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अधोगतीला गेले. महाविकास आघाडीतील नेत्यांचा भ्रष्टाचार आणि खंडणीखोर वृत्तीमुळे उद्योग राज्याबाहेर गेले. केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्यासाठी निधी दिला जात होता. तो निधीही महाविकास आघाडीने बंद केला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी मंगळवारी येथे केला.

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटर येथे भंडारी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यम समन्वयक अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, संजय मयेकर आणि हेमंत लेले यावेळी उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीत राज्याचे अस्तित्व पणाला लागले आहे. राज्याची प्रगती होणार की अधोगती हे ठरविणारी ही निवडणूक आहे. विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार हवे, याचा निर्णय या निवडणुकीत मतदार करतील, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी… झाले काय, होणार काय?

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्याची अधोगती झाली. भ्रष्टाचार आणि खंडणीखोर वृत्तीमुळे नाचक्की झाली. महायुतीच्या काळात कोणतेही उद्योग राज्याबाहेर गेले नाहीत. मात्र, परकीय गुंतवणूक वाढली आहे. महायुतीने अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले.

Story img Loader