भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती देणाऱ्या ‘मॅजिक स्क्वेअर’ची निर्मिती करण्यात आली असून पंडितजींच्या जन्मतिथीचे औचित्य साधून प्राध्यापक सुहास पाकणीकर यांनी अशा अनोख्या पद्धतीने पंडितजींना श्रद्धांजली वाहिली आहे.
या ‘मॅजिक स्क्वेअर’मध्ये ४ ओळी आणि ४ स्तंभ असे १६ चौरस आहेत. यातील प्रत्येक चौरसामध्ये एक आकडा आणि एक अक्षर लिहिलेले आहे. प्रत्येक चौरसाला एक रंग दिलेला आहे. या मॅजिक स्क्वेअरमधील प्रत्येक ओळ, स्तंभ, कर्ण आणि प्रत्येक रंगाच्या चौरसातील आकडय़ांची बेरीज ४७ होते. या ‘मॅजिक स्क्वेअर’मधील आकडय़ांमध्ये पंडितजींची जन्मतारीख (०४-०२-१९२२) दडलेली आहे. या चौरसातील आकडे आणि अक्षरे यांचा वापर यातून काही समीकरणांची निर्मिती केली आहे. त्या प्रत्येक समीकरणाच्या उत्तरामधून पंडितजींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याची तारीख मिळते. याबाबत पाकणीकर यांनी सांगितले, ‘‘गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी तयार केलेला स्वत:च्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा मॅजिक स्क्वेअर पाहण्यात आल्यानंतर पंडितजींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर ‘मॅजिक स्क्वेअर’ तयार करण्याची कल्पना सुचली.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा