शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने स्पष्ट केले. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसच्या माध्यमातून २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या परीक्षेसाठी राज्यभरातील २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या तारखेचा अंदाज उमेदवारांना येण्यासाठी संकेतस्थळावर स्पष्टीकरण दिले. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha tait result 2023 will declare be between 24 march pune print news cp 14 zws