मावळ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे. मतांची विभागणी करण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या दोन व्यक्तींना निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याचा आरोप संजोग वाघेरे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…

यावरून आता संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीरंग बारणे यांना पराभव दिसत असल्याने रडीचा डाव खेळत असल्याची टीका वाघेरे यांनी केली आहे. ‘संजय वाघेरे’ आणि ‘संजोग पाटील’ नावाच्या दोन व्यक्तींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या नावात आणि अपक्ष दोन्ही उमेदवाराच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य आहे, यातून मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संजोग वाघेरे म्हणाले, श्रीरंग बारणे यांना पराभव दिसत असल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत. यातून बारणे यांचा बलिशपणा दिसतो आहे. नावात साम्य असलेल्या व्यक्ती ते निवडणुकीत उभ्या करत आहेत. सोबत बारणेंचे बगलबच्चे असतात, यातून हा डावपेच श्रीरंग बारणेंचा आहे, हे स्पष्ट होत आहे. ते पुढे म्हणाले, पण मतदारराजा सूज्ञ आहे. ते महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा देऊन मला विजयी करतील, असा विश्वासही संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi candidate sanjog waghere slams shrirang barne over persons with similar name filing nomination kjp 91 zws