कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि शिंदे भाजप गटाचे क२र्यकर्ते एकमेकांना भिडले. अजित पवार यांच्या उपस्थितीत फडके हौद चौकातील गुजराती शाळेसमोर ‘रोड शो’ आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी समयसूचकता दाखवित रोड शो ला मार्ग करून दिला.
हेही वाचा >>> “पहाटेची शपथ हा अजित पवारांचा स्वार्थीपणा”, रावसाहेब दानवेंची टीका; म्हणाले, “गणिते..”
कसबा विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीत भाजप उमेदवार हेंमत रासने यांच्या प्रचारासाठी विविध समाज घटकांचा मेळावा सुरू आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थित रोड शो सुरू आहे. शिंदे यांचा मेळावा सुरू असतानाच महाविकास आघाडीचा रोड शो फडके हौद चौकात आला. त्यानंतर दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.