पुणे : महाडीबीटी संकेतस्थळावर ‘राइट टू गिव्हअप’चा पर्याय निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्ती मिळणार आहे. संबंधित अर्ज पुनर्स्थापित करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने गॅस अनुदान सोडण्यासाठी दिलेल्या पर्यायाच्या धर्तीवर स्वेच्छेने शिष्यवृत्ती सोडण्यासाठी राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ‘राइट टू गिव्हअप’चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी चुकून हा पर्याय निवडला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गमवावी लागणार होती. मात्र चुकून राइट टू गिव्हअप पर्याय निवडलेल्या त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याची मागणी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

हेही वाचा : पुणे : विधानसभा फॉर्म्युला ठरला! जिल्ह्यात एक तर ताकद असलेल्या ठिकाणी दोन जागा मागणार- सचिन अहिर

राइट टू गिव्हअपचा पर्याय निवडून शिष्यवृत्ती रद्दबातल झालेल्या अर्जाच्या पुनर्स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करता येणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून प्राचार्य लॉगइनमधून अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करून घ्यावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. ‘रिव्हर्ट बॅक’ झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लागइनमधून ऑनलाइन फेरसादर करणे आवश्यक राहील. या संदर्भात काही अडचण उद्भवल्यास संबंधितांनी जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले.