कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर उमेदवार आहेत. ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विविध नेते प्रचारार्थ येत आहेत. आज महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रासप अध्यक्ष महादेव जानकर हे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन महादेव जानकर यांनी रासनेचा प्रचार कमी आणि रासपची पुढील वाटचाल कशी राहणार, याबाबत माहिती सांगितली. त्यामुळे प्रचाराला आले रासनेच्या, पण प्रचार करून गेले रासपचा, अशी चर्चा सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी महादेव जानकर म्हणाले की, मी खडकवासला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माझ्या प्रचारासाठी हेमंत रासने हे आले होते. त्यावेळी त्यांनी चांगले काम केले होते. तसेच, मी महायुतीचा घटक असल्याने त्यांच्या प्रचाराला आलो असून, आमचा नक्कीच हेमंत रासने यांना फायदा होईल. ते विजयी होतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – घोटाळेबाज नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहकच मिळेना; पुन्हा होणार लिलाव, कर्ज आणि फ्लॅटची रक्कम किती?

हेही वाचा – पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई, कारागृहात स्थानबद्ध करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

राष्ट्रीय समाज पक्षाचे जाळे चार राज्यांत पसरले असून, आणखी विस्तार कसा होईल याकडे आमचे लक्ष आहे. गुजरातमध्ये २८ नगरसेवक, एक नगरसेवक बंगळुरूमध्ये आहे. एक जिल्हा परिषद सदस्य गुवाहाटी येथे असून, मी उद्या तिकडे जाणार आहे. महाराष्ट्रमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ९८ सदस्य निवडून आले आहेत. तर आजपर्यंत चार आमदार हे रासपचे निवडून आले आहेत. मी जरी महायुतीसोबत असलो. तरी आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका रासप स्वतंत्र लढणार आहे. त्यामध्ये आम्ही निश्चित ताकद दाखवून देणार असल्याचेदेखील महादेव जानकर म्हणाले.