‘‘मुले अनुकरणातून आणि वातावरणाप्रमाणे घडत जातात. कोणत्याही दबावाशिवाय मुलांनी आपला भार उचलणे, चांगला माणूस म्हणून उभे राहणे, ही सुजाण पालकत्वाला मिळालेली पावती असले,’’ अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी सर फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पालकदिन समारंभामध्ये रविवारी व्यक्त केले.
सर फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पालकदिनाचे औचित्य साधून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘महापालक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री संजय देवतळे, सिम्बॉयोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, दिव्य मराठीचे सल्लागार संपादक यमाजी मालकर, सर फाऊडेशनचे संस्थापक हरीश बुटले, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. यावेळी ‘तुम्ही-आम्ही पालक’ या मासिकाच्या प्रथम अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रकाश आमटे म्हणाले,‘‘मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका. वातावरणातून होणाऱ्या संस्कारांमधून मुलं आपोआप घडत असतात. मात्र, त्यांच्यावर तेवढा विश्वास दाखवणेही आवश्यक आहे.’’ मुलांना सगळ्या सुविधा देणे म्हणजे पालकत्व नाही, तर चांगला माणूस घडवणे म्हणजेच सुजाण पालकत्व आहे,’ असे मत डॉ. मंदाकिनी आमटे यांनी व्यक्त केले.
यावेळी देवतळे म्हणाले, ‘‘सध्या माहितीचा आणि स्पर्धेचा महापूर आलेला आहे. त्यामध्ये आपले मूल वाहून जाणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. मात्र, त्यासाठी पालकांचेच पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असावेत.’’
मुलाने चांगला माणूस होणे ही पालकत्वाला मिळालेली पावती – डॉ. प्रकाश आमटे
मुलांनी आपला भार उचलणे, चांगला माणूस म्हणून उभे राहणे, ही सुजाण पालकत्वाला मिळालेली पावती असले,’’ अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
First published on: 29-07-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahapalak reward to mr and mrs amte by sir foundation