पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात सर्वाधिक आठ नगरसेवक भोसरीतील आहेत. आणखी काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत होणाऱ्या पक्षांतरामुळे भाजपच्या अडचणींत भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता २०१७ मध्ये भाजपने उलथवून टाकली. राजकीय वातावरण बदलल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हाती घेतले. महापालिकेवर प्रथमच कमळ फुलले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले.

maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Chinchwad, Bhosari ajit pawar NCP party
चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!
Chinchwad and Pimpri Assembly Constituencies Assembly Election 2024 Rebellion in Mahayuti in Pimpri Chinchwad pune news
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत बंडखाेरीचे फटाके
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maval assembly constituency
मावळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी

महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद मिळाली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी, तर उमा खापरे, अमित गोरखे यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे यांना महामंडळ देऊन राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला गेला. शहरात भाजप ताकदवान पक्ष झाला. चार आमदार असल्याने पिंपरी-चिंचवडही भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…

महापालिकेतील पदांचे वाटप करताना मात्र काहींना पदे देता आली, तरी काहींना आश्वासन देऊनही ती देता आली नाहीत. त्यामुळे पाचच वर्षांत नाराजी वाढली. अशा नाराज माजी नगरसेवकांनी भाजपची साथ सोडण्यास सुरुवात केली आहे. काहींनी पद मिळूनही अधिकार दिले नाहीत, अशी तक्रार करून बाहेरचा रस्ता धरला आहे. आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. त्यात चिंचवडमधील माया बारणे, बाबा बारणे, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, चंदा लोखंडे यांचा समावेश असून, भोसरीतील सर्वाधिक आठ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामध्ये वसंत बोराटे, संजय नेवाळे, लक्ष्मण सस्ते, प्रियांका बारसे, भीमाबाई फुगे, सारिका लांडगे, रवी लांडगे, एकनाथ पवार अशा आठ जणांनी भाजपला रामराम ठोकला. त्यातील रवी लांडगे आणि पवार यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उर्वरित माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

हेही वाचा >>> अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण

तक्रारी काय?

सक्षम असताना महापालिकेतील पदांपासून आमदारांनी डावलले, एकही पद दिले नाही, सातत्याने अन्याय केला, विकासकामे रोखली, आम्ही केलेल्या पाठपुराव्याने झालेल्या कामांचे श्रेय घेतले जाते. दादागिरी सहन करावी लागते, अशा तक्रारी करून नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.