भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्याला विरोधकांनी त्रास दिल्याने लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिली आहे. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. विरोधकांनी हे न थांबवल्यास वीस तारखेच्या नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. माझ्या शांततेचा अंत पाहू नका. असा इशारा विरोधकांना महेश लांडगे यांनी दिला आहे. महेश लांडगे हे संतापले होते. राजकारण हा माझा पिंड नाही. हे देखील विरोधकांनी लक्षात ठेवावं. असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना एक प्रकारे तंबी दिली आहे. महेश लांडगे हे दिघी मध्ये जाहीर सभेत बोलत होते. यावेळी आमदार पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.
महेश लांडगे म्हणाले, दहा वर्षापासून काम करत आहे. परंतु, गेल्या तीन महिन्यापासून मी सगळं सहन करत आहे. २० तारखेपर्यंत सगळं सहन करणार आहे. विरोधकांना दिघीतील जाहीर सभेतून सांगतो, माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवा त्याला मी उत्तर देईल. पण, माझ्या कार्यकर्त्याला कोणी काही बोललं तर वीस तारखेच्या नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. अशी तंबी विरोधकांना महेश लांडगे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी सगळे विरोधक एक झाले आहेत. त्यांना नम्र विनंती आहे. निवडणूक लढत असताना आपली संस्कृती जपा. चऱ्होलिमध्ये एक प्रकार झालेला आहे. असा प्रकार परत करू नका. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. माझा पिंड राजकारणाचा नाही…असा इशारा लांडगे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, राजकारणाची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधी चुकीचं काम केलेलं नाही.
हेही वाचा >>> अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण
वीस तारखेपर्यंत तुमच्यात बदल झाला नाही, तर मी मागील दहा वर्षाचा स्वभाव बदलणार आहे. ज्या- ज्या विरोधकांना मी मदत केलेली आहे. रात्री- अपरात्री सहकार्य केले. मी त्यांना ठणकावून सांगतो, माझा पिंड हा राजकारण नाही. मी एक- एक माणूस (कार्यकर्ता) फार जपतो. जर त्या माणसाला त्रास होत. असेल मी माझी पण मर्यादा सोडेल. विरोधकांनी प्रचार करावा चुकीचं काम करू नये. माझ्या शांततेचा अंत पाहू नका. मी आजपर्यंत विरोधकांना फार सहन केलं. मला फरक पडत नाही. पण, माझ्या सहकार्याला त्रास दिला खपवून घेणार नाही. विरोधकांनी ही निवडणूक हसत खेळत पार पाडावी. आरोप- प्रत्यारोप होत असतात. अस ही महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.