पुणे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे)  अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुणे दौऱ्यामध्ये ठाकरे यांच्या पुण्यात सभा होणार आहेत. ९ नोव्हेंबरला कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी, तर १३ नोव्हेंबरला खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जाणार आहेत. मात्र या सभेची ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेने चार उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. दोन टप्प्यात ठाकरे यांच्या सभा होणार असून ९ नोव्हेंबरला कसबा आणि कोथरूड, तर १३ नोव्हेंबरला खडकवासला, हडपसर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मात्र, या सभेची ठिकाणे अद्यापही निश्चित झाली नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>> काँग्रेसला बंडखोरी रोखता आली नाही ही शोकांकिका कोणी केली ही टीका !

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंंबा जाहीर केलेली मनसे विधानसभा निवडणूक लढणार की, महायुतीला पाठिंबा देणार याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना हडपसरमधून, मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना खडकवासलात, माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना कोथरूडमधून, तर कसबा विधानसभा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !

विधानसभा निवडणुकीला कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे केल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून ठाकरे यांनी आतापर्यंत महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षावर टीकेची झोड उठवित जुन्या सत्ताधाऱ्यांना दूर करा आणि नव्यांना संधी द्या, असे आवाहन केले आहे. पुणे शहरात मनसेला मानणारा वर्ग मोठा आहे यापूर्वी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. यामध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक असते. यापासून वर पुढील तीन दिवसांनी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेकडे लक्ष लागले आहे. यामध्ये ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader