अजित पवारांच्या नेत्यांना महायुतीचा पराभव दिसत असल्याने वेगवेगळी विधान करत आहेत. महायुतीला बहुमत मिळणार नसल्याने अजित पवारांचा पक्ष किंगमेकर ची भूमिका पार पडेल असं त्यांच्या नेत्यांना वाटत आहे. महायुतीमध्येच तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटल आहे. रोहित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार हे भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आले आहेत. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असून सत्तेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही. अस ही रोहित पवार यांनी अधोरेखित केले आहे.
हेही वाचा >>> आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
रोहित पवार म्हणाले, भोसरीमध्ये गेल्या काही वर्षात ठराविक लोकांचा विकास झाला आहे. आता बदल घडेल. भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे हे निश्चित आमदार होतील. पुढे ते म्हणाले, अजित पवारांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीचा पराभव दिसत आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही. अजित पवारांच्या पक्षाला वाटत आहे. आपण किंग मेकर म्हणून काम करू. परंतु, महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करत आहेत. ५७ ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. महायुतीचा शंभर टक्के घोळ होणार आहे. अजित पवारांचे नेते घाबरलेले आहेत. पुढे ते म्हणाले, १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीचा होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबत असलेल्या पक्षांची मदत लागणार नाही. अस ही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.