पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१२ नोव्हेंबर) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. मोदी यांची जाहीर सभा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून, या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

शहरात जड वाहनांना बंदी

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांनी शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. जड वाहनांसाठी बंद असलेले रस्ते पुढीलप्रमाणे – सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे), नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे), आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे), जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे), ओैंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे), बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकच्या पुढे), पाषाण रस्ता (छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे), पौड रस्ता (पौडा फाटा चौकाच्या पुढे), कर्वे रस्ता (वारजे उड्डाणपुलाच्या चौकाच्या पुढे), सिंहगड रस्ता (वडगाव उड्डाणपुलाच्या पुढे), सातारा रस्ता (मार्केट यार्ड चौकाच्या पुढे), सासवड रस्ता (बोपदेव घाटमार्गे) कोंढव्यातील खडी मशीन चौकाच्या पुढे, हडपसर ते सासवड रस्ता (मंतरवाडी फाटा ते हडपसरकडे ), लोहगाव रस्ता (पेट्रोल साठा चौकाच्या पुढे)

चौकटमध्यभागातील वाहतूक बदल

टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit pune print news rbk 25 zws