पुणे : ‘माझी आई ८७ वर्षांची आहे. तिला प्रचाराच्या सांगता सभेत आणणे कितपत योग्य आहे, याची माहिती नाही. मात्र, आईचा वापर राजकारणासाठी करणे अयोग्य आहे,’ असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू आणि बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी येथे व्यक्त केले. आईने गेल्या वीस-पंचवीस वर्षात कधीही पत्र लिहिलेले नाही. त्यामुळे सभेत वाचून दाखविलेले पत्र तिचेच आहे का, अशी विचारणाही श्रीनिवास यांनी केली.

बारामती येथील प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवार यांच्या आई आशा उपस्थित होत्या. त्यावेळी पवार यांनी आईने लिहिलेले पत्र सभेत वाचून दाखविले होते. या पार्श्वभूमीवर बारामती येथे माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवार यांनी याबाबत शंका उपस्थित केली.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

‘माझी आई ८७ वर्षांची आहे. तिचा राजकारणासाठी वापर होतो याचे मला वाईट वाटते आहे. अजित पवार यांची जशी ती आई आहे, तशीच माझीही आहे. आईनेच ते पत्र लिहिले का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तिने कधीही आम्हाला पत्र लिहिलेले नाही. त्यामुळे ते पत्र आईचेच असेल का?’ असे श्रीनिवास पवार म्हणाले.

आईच्या आजारपणाबाबतची माहिती अजित पवार यांनी सभेत दिली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ते थांबवून तिला आठ दिवसांसाठी बारामती येथे आणण्यात आले. तिला पुन्हा उपचारासाठी नेले जाईल. मात्र, या परिस्थितीत तिला इथे आणण्याचा आग्रह मी धरला नसता, असेही श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> बारामतीमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी, युगेंद्र पवार यांच्या ‘शोरूम’ची, तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या संस्थेची तपासणी

‘मी तिला भेटल्यानंतर ‘मी दमले आहे, आजारपणाला कंटाळले आहे,’ असे तिने सांगितले होते. पण आई सोमवारी सांगता सभेत दिसल्याने आश्चर्य वाटले. या वयात व्यक्ती परावलंबी होतो, बाकीचे तुम्ही समजून घ्या,’ असेही श्रीनिवास पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> पुणे : भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रवादी’चा ठिय्या

लोकसभेला जे झाले तेच परत करण्याची बारामतीच्या मतदारांची इच्छा आहे. बारामतीचे मतदार शरद पवार यांनाच मानतात. बारामतीची जबाबदारी वीस-पंचवीस वर्षे शरद पवार यांनी अन्य व्यक्तीकडे सोपविली. बारामतीकर शरद पवार यांना निराश करणार नाहीत, असेही श्रीनिवास म्हणाले.

‘हीच भाजपची नीती’

पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयोटा शोरूमची तपासणी केल्याप्रकरणी श्रीनिवास पवार म्हणाले, सोमवारी रात्री येथे पाच ते सहा अधिकारी आले. त्यांनी तपासणी केली. सुरक्षारक्षकाने त्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्यावर त्याला रोखण्यात आले. या तपासणीसंदर्भात वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा तक्रारीच्या अनुषंगाने ती झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तक्रार कोणाची होती, हे सांगितले नाही. आम्ही येथे व्यवसाय करतो, रितसर कर भरतो.

Story img Loader