पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांत समाविष्ट गावांमध्ये अनेक कामे करून दाखवली आहेत. ही कामे केल्यानंतरही केवळ विरोधाला विरोध आणि राजकारणात टिकायचे म्हणून टीका करायची. “याला पाडा त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

‘‘अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला. महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की,  या सभेला येण्यापूर्वी मी या मतदारसंघाची माहिती घेत होते. माहिती घेत असताना सध्या विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची माहिती मिळाली. मात्र महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या समाविष्ट गावांमध्ये केलेले काम मी पाहिले आहे.

80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>> भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

राज्यघटना भवन, न्यायालय संकुल, संतपीठ यांसारखी कामे करून नागरिकांच्या हृदयात महेश लांडगे यांनी स्थान मिळवले आहे. कार्यकर्त्यांनी नागरिकांना या कामाची आठवण करून देणे गरजेचे आहे. सद्या महाविकास आघाडीकडे बोलायला मुदत नाही. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची निवडणुकीतील जुमलेबाजी सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा संकल्प राहिलेला नाही. राजकारणात हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच काम दाखवावे लागते. जे काम महेश लांडगे यांनी केलेले आहे. या विकासाच्या कामावरच यंदा त्यांची हॅट्रिक निश्चित आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

आंब्याच्या झाडाला दगडे मारले जातात

कुणीही कडुलिंब, बाभळीला नाही तर आंब्याच्याच झाडाला दगडे मारतात. पैलवानाने व्यथित होऊन नाही तर बलवान होऊन राजकारण करायचे आहे. बल बुद्धी आणि विद्या हे सर्व काही एका पैलवानाकडेच असते. असा गैरसमज आहे की पैलवानाला फक्त भावना कळतात नव्हे, तर पैलवान कोणत्या वेळेला शरीराचा कोणता स्नायू वापरून शत्रूला चिटपट करायचे हे ठरवत असतो. म्हणून आमदार महेश लांडगे यांनी राजकीय पैलवान होऊन टीकेला उत्तर न देता केलेले काम दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक चितपट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

Story img Loader