दहावीचा निकाल ९९.९५ टक्के ; मूल्यमापनामुळे यशवंतांचा विक्रम
पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार के लेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे सारेच उत्तीर्ण होण्याची शक्यता असतानाही ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४८ विद्यार्थी शाळा, शिक्षकांच्या संपर्कातच नसल्याने त्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले नाही.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक १०० टक्के , नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९९.८५ टक्के लागला. राज्यात ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. करोनाकाळात विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दहावीचा निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. राज्य मंडळाच्या १९७५ पासूनच्या इतिहासात गेल्या वर्षीचा ९५.३० टक्के लागलेला निकाल सर्वाधिक होता. तो विक्रम मोडीत काढून यंदाच्या निकालाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्के वारी जास्त आहे. नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के आणि नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला.
पाटील म्हणाले, की दहावीच्या परीक्षा घेण्याचे राज्य मंडळाने पूर्ण नियोजन के ले होते; पण करोनाची परिस्थिती न सुधारल्याने राज्य शासनाच्या निर्णयानुसार अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत शाळा, शिक्षक, अधिकारी अशा सर्वांच्या सर्वतोपरी सहकार्यामुळे निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले.
दृष्टिक्षेपात निकाल
नोंदणी के लेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ७५ हजार ८०६
शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन प्राप्त झालेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ७५ हजार ७५२
उत्तीर्ण नियमित विद्यार्थी – १५ लाख ७४ हजार ९९४
निकालाची टक्के वारी – ९९.९५
पुनर्परीक्षार्थी – ८२ हजार ८०२
शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन प्राप्त झालेले पुनर्परीक्षार्थी – ८२,६७४
उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी – ७४ हजार ६१८
खासगी विद्यार्थी – २८ हजार ४२४
उत्तीर्ण खासगी विद्यार्थ्यांची टक्के वारी – ९७.४५
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्के वारी – ९७.८४
१०० टक्के निकाल लागलेल्या शाळा – २२ हजार ३८४
शून्य ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळा – नऊ
२७ विषयांचा निकाल – १०० टक्के
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी – ४,९२२
गुणवंत अधिक…
गेल्या वर्षी ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळाले होते. तर यंदा १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २१ हजार ३७१ नी वाढल्याचे दिसून येते.
पैकीच्या पैकीही जास्त…
राज्यात यंदा १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे. यंदा राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना, तर गेल्या वर्षी २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. यंदा १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि अमरावती विभागातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. औरंगाबादच्या २६१, लातूरच्या २७८, अमरावतीच्या १०५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर पुणे विभागातील ७९, नागपूर विभागातील २५, मुंबई विभागातील ३२, कोल्हापूर विभागातील ९२, नाशिक विभागातील ६१, कोकण विभागातील २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
विभागीय मंडळनिहाय निकाल
मुंबई – ९९.९६
पुणे – ९९.९६
नागपूर – ९९.८४
औरंगाबाद – ९९.९६
कोल्हापूर – ९९.९२
अमरावती – ९९.९८
नाशिक – ९९.९६
लातूर – ९९.९६
कोकण – १००
सर्वांत आधी निकाल…
परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर सीबीएसई आणि आयसीईएसई यांनी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र न्यायालयात सादर के ले होते. तर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र ठरवण्यात राज्य शासनाने बराच वेळ घालवला होता. असे असतानाही राज्य मंडळाने सीबीएसई आणि आयसीईएसई यांच्याआधी प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर के ला आहे.
पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी यंदा नाही…
राज्य मंडळाने दहावीच्या निकालासाठी शाळा स्तरावरील सत्र परीक्षा, सराव परीक्षा, तोंडी परीक्षा, चाचणी, गृहपाठ अशा पद्धतींचा वापर के ला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे निकालानंतर उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसल्याचे मंडळाने स्पष्ट के ले आहे.
वर्षनिहाय निकाल
२०१६ – ८९.५६
२०१७ – ८८.७४
२०१८ – ८९.४१
२०१९ – ७७.१०
२०२० – ९५.३०
२०२१ – ९९.९५
येत्या शैक्षणिक वर्षापासून सातत्यपूर्ण मूल्यमापन
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. परीक्षा रद्द केल्या तरी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा पेच निर्माण झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातही परिस्थिती सुरळीत झाली नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून अंतर्गत मूल्यमापन करून ठेवण्यासाठी नियोजन करण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे. दोन चाचण्या आणि सहामाही परीक्षेचे गुण शासनाच्या प्रणालीवर नोंदवावे लागणार आहेत. त्यामुळे यंदा दहावी, बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्व परीक्षा गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत.
संकेतस्थळ कोलमडले…
पुणे : निकाल जाहीर झाल्यावर काही वेळात प्रणाली कोलमडली. त्यामुळे जवळपास चार ते पाच तास विद्यार्थी, पालकांना निकाल पाहता आला नाही. सायंकाळी प्रणाली धिम्या गतीने सुरू झाली. निकाल जाहीर झाल्यावर दुपारी १ पासून ऑनलाइन निकाल उपलब्ध होतो. तसेच त्याची प्रतही घेता येते. मात्र उत्सुकतेमुळे एकाच वेळी अनेकांकडून संके तस्थळाला भेट देण्यात आल्याने प्रणालीवरील ताण वाढून ती कोलमडली. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, की अनेकांना एकाच वेळी निकाल जाणून घ्यायचा असल्याने संके तस्थळाला भेट देण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यामुळे प्रणालीवर ताण आला होता. त्यानुसार प्रणालीत बदल करण्यात आला.
गुणवंत अधिक…
गेल्या वर्षी ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळाले होते. तर यंदा १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्के किं वा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २१,३७१ नी वाढल्याचे दिसून येते.