पुणे : राज्यातील चार कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची समाईक प्रवेश परीक्षा २३ ते २५ मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांतील विविध विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०२४-२५मध्ये अंतिम वर्षातील पदवी परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. http://www.mcaer.org या संकेतस्थळाद्वारे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या समाइक प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्यासाठी १२ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र १४ मेपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षेतील पात्र, अपात्र उमेदवारांची यादी १८ ते २० मार्च या कालावधीत प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२५५२८११९, २५५२८५१९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.