पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीस निर्माण झालेले ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले होते. हे सावट दूर होऊन राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले असले तरीही राज्याला अपेक्षित थंडीची प्रतिक्षा कायम आहे. पुढील आठवड्यात किमान तापमानाचा पारा फारसा खाली जाण्याची शक्यता नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मध उत्पादन क्षेत्रात सावळा गोंधळ; मधपाळ, मध उत्पादनाची आकडेवारी नाही

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी विक्षोपाचा म्हणजे थंड वाऱ्याच्या प्रवाहाचा प्रभाव राहणार आहे. मात्र, त्याचा राज्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. राज्यावर सध्या कोणतीही हवामान विषयक प्रणाली सक्रीय नाही. त्यामुळे राज्यात सध्या कोरडे वातावरण आहे. पुढील आठवड्यातही कोरडे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात एक-दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. सोमवारी जळगावात राज्यात सर्वात कमी किमान ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबादमध्ये १०.२, नाशिकमध्ये ११.१, नगरमध्ये ११.५ आणि यवतमाळमध्ये १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात किमान तापमान सरासरी १३.०, मराठवाड्यात १४.०, मध्य महाराष्ट्रात १३.० आणि किनारपट्टीवर २०.० अंश सेल्सिअस राहिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra continues to wait for the expected winter pune print news dbj 20 zws
Show comments