बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांंतील ४५० सराइतांची चौकशी करण्यात आल्यावर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, एकाला अटक, तर दोघांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती जाहीर करत कोेणतेही धागेदोरे हाती नसताना पुणे पोलिसांनी केलेल्या कामागिरीचे कौतुक केले.

पुणे शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या सात पोलीस ठाण्यांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बोपदेव घाट प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरु आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. तपासात, तसेच येवलेवाडी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या माहितीनंतर एकाला येवलेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर पसार झालेल्या दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा >>> बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. बोपदेव घाटातील माेबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आले होते.

हेही वाचा >>> पिंपरीतील ‘त्या’ प्रकरणात प्रेयसीचाही मृत्यू; लॉजमध्ये प्रियकर आणि प्रेयसी…

पुणे शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरातील ४० गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावातील ढाबे, दारूविक्रेते, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या. ग्रामीण पोलिसांच्या सासवड, राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून अहोरात्र तपास करण्यात येत आहे. तपास पथकात जवळपास ७०० पोलीस कर्मचारी सहभागी होते. बलात्कार प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे.

देवेंद्र फडणवीस</strong>, गृहमंत्री