पिंपरी : राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.

हेही वाचा >>> तपासाच्या व्याप्तीत वाढ, ‘बोपदेव घाट’ प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके

अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड औद्योगि नगरी आहे. त्यात शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मूलभूत गरजाचा पोहचवता आले पाहिजे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुविधा पुरविताना ताण येत आहे. राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था चांगलीच राहिली पाहिजे.चुक होता कामा नये, दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.  शंभराव नाट्य संमेलन शहरात झाले. अखिल भारतीयसाहित्य संमेलन ही या शहरात पार पडले. शहर नियोजन पद्धतीने वाढले पाहिजे. त्यातून विकासकामे झाली पाहिजेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. योग्य व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी काम सुरू आहे. या कामामध्ये सातत्य राहिले पाहिजे.

हेही वाचा >>> जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांना हेलपाटे, हे आहे कारण!

लोकप्रतिनिधीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांना दिली. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोचे कामे लवकर कशी होतील, याकडे पाहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. अशा सूचना पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी अंगिकरून आपण समजात वावरले पाहिजे. देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.  पिंपरीत माता रमाई स्मारकाचे काम हाती घेण्याची सूचनाही पवार यांनी केली.

हेही वाचा >>> नवरात्रातील उपवासकाळ असूनही केळ्यांना मागणी कमी

या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण,  पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (आयसीसीसी)चे लोकार्पण,  निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण,  रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर भुयारी मार्ग (सबवे ) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा एकचे शुभारंभ,  मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra economic situation strong says ajit pawar blames opposition for spreading rumours pune print news ggy 03 zws