पुणे : एकीकडे महागाईबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत राज्यभरातून २४ लाख १४ हजार ९६३ दस्त नोंदविण्यात आले असून तब्बल ३८ हजार ५९७.४४ कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. दरवर्षी १ एप्रिल रोजी नवे वार्षिक बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) लागू होतात. या पार्श्वभूमीवर चालू महिन्यातील शेवटच्या आठ दिवसांत विक्रमी दस्तनोंदणी होण्याची शक्यता आहे.

वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. शासनाकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले जातात. रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो प्रकल्प आदींबरोबर विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांसाठी शासनालाही मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. शासनाकडे जमा होणारा हा महसूल विविध विकासकामांवर खर्च केला जातो. जमा होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा याचा निर्णय होत असतो. त्यामुळे नोंदणी विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलाकडे शासनाचे लक्ष असते.

devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Devendra Fadnavis Constituency, Sachin Waghade,
फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

दरम्यान, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांत २७ लाख ६८ हजार ४९२ दस्त नोंद होऊन २५ हजार ६५१.६२ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांत २३ लाख ८३ हजार ७१२ दस्त नोंद होऊन ३५ हजार १७१.२५ कोटींचा महसूल मिळाला होता, तर चालू आर्थिक वर्षांत १४ मार्चपर्यंत २४ लाख १४ हजार ९६३ दस्त नोंद होऊन ३८ हजार ५८७.४४ कोटींचा महसूल मिळाला आहे. यंदा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला सुरुवातीला ३२ हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, जास्त महसूल मिळाल्याने आता ४० हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षांतील नोंदविलेले दस्त आणि महसूल

महिना                दस्त संख्या            महसूल (कोटींत)

* एप्रिल                २,११,९१२            १८०२.९४

* मे                    २,२२,५७६            २८०७.७७

* जून                 २,४१,२८६            ३४२३.८९

* जुलै                 २,०५,७०९            ३५३६.५२

* ऑगस्ट             १,९७,५७७            ३२९३.१७

* सप्टेंबर             २,०६,६६२            ३४२९.८१

* ऑक्टोबर          १,७७,५०६            ३४८४.७२

* नोव्हेंबर             २,१०,१७२            ३५४२.४४

* डिसेंबर             २,०२,६०३            ४०२७.९४

* जानेवारी           २,१७,५७४            ३६२४.६६

* फेब्रुवारी            २,२५,१७९            ३९६०.५७

* १४ मार्च २०२३ ९६,२०७                १६३३.०१

एकूण                  २४,१४,९६३         ३८,५९७.४४