पुणे : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत स्वयंचलितरीत्या नामंजूर (ऑटो रिजेक्ट) झालेले प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज आणि प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत महाडीबीटी प्रणालीमार्फत अर्ज करताना आलेल्या विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरूनही स्वयंचलितरीत्या नाकारले (ऑटो रिजेक्ट) गेले आहेत. एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा किंवा पुरवणी परीक्षेचा निकाल मुदतीत न लागल्याने अर्ज भरता न येणे, अर्ज भरूनही पुढील वर्षीचा अर्ज नूतनीकरण करता आले नाही. अशा अडचणींमुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नाही. ही बाब विचारात घेऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे या योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ?…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
skipping name of main culprit in crime become trouble for PSI
गुन्ह्यातून सराईत गुन्हेगाराचे नाव वगळणे ‘पीएसआय’ला भोवले
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Theur, Bangladesh citizen Theur,
पुणे : थेऊर येथे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर गुन्हा दाखल
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
pune municipal
ठरले तर..! यावेळी होणार पुणे महानगरपालिकेचे विभाजन
Men lag behind women , Pune, municipal statistics pune,
पुण्यात महिलांच्या तुलनेत पुरुष मागेच! महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आलं वास्तव

हेही वाचा : थंडीचा जोर आणखी वाढणार? काय आहे हवामानतज्ज्ञांचा अंदाज?

योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन अर्जावर महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिले आहेत.

Story img Loader