पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम या संदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागाने तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवर नियंत्रणाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> “तुमच्या छातीवर चढून…”, राम मंदिरप्रकरणी वाजपेयींना खिजवणाऱ्या काँग्रेसवर देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

राज्यात शासकीय अंगणवाड्यांसह खासगी बालवाड्या अक्षरश: गल्लोगल्ली आहेत. मात्र त्यावर कोणतेही शासकीय नियंत्रण नाही. बालवाडी सुरू करण्यासाठीची मान्यात प्रक्रियाही सध्या अस्तित्त्वात नाही. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या चौकटीत आणण्यात आले आहे. तसेच पूर्वप्राथमिक ते दुसरीसाठीचा राज्य स्तरावरील अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्यातील खासगी बालवाड्यांवर सरकारी नियंत्रण आणण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> “फक्त मोदींची हवा आहे, लोकसभेमध्ये आम्ही…”, ‘सी व्होटर’ सर्व्हेनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की खासगी बालवाड्यांवर नियंत्रण आणण्याबाबतच्या नियमावलीचा मसुदा तयार करून काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आला. तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात मान्यता प्रक्रिया, अभ्यासक्रम, किमान सुविधा यावर भर देण्यात आला आहे. खासगी बालवाड्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत समानता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नियमावलीचे विधेयक तयार होऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. 

राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर  सुमारे बाराशे हरकती-सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला होता. तसेच त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या. या आराखड्यावर आलेल्या सुमारे बाराशे हरकती-सूचना विचारात घेऊन आता लवकरच अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.