पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर कार्यवाही सुरूही झाली आहे. मात्र, त्यासाठी कायदेशीर वेळ देण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. राज्यकर्ते म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आणि दोन समाज एकमेकांसमोर येऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. ओबीसी समाजाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात राज्य शासनाला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

हेही वाचा >>> Video: मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की…”

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच भूमिका जाहीर केली आहे. राज्य शासनाची भूमिकाही सुस्पष्ट आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी कायदेशीर वेळ द्यावा लागणार आहे. तो निश्चित दिला जाईल. राज्यकर्ते म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. दोन समाजांत संघर्ष होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही, या दृष्टीने काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. फडणवीस विमानतळाकडे जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader