पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शासकीय असल्याने आर्थिक कमतरता असल्यास राज्य सरकारने निधी द्यावा. विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन विद्यापीठ चालवणे योग्य नाही. एका बाजूला विद्यापीठाच्या ठेवी मोडल्या जातात, तर दुसरीकडे शुल्कवाढ केली जात असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पवार विद्यापीठात आले होते. आंदोलक विद्यार्थ्यांसह पवार यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

पवार म्हणाले, की शुल्कवाढीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास प्रशासन जबाबदार असेल. विरोधी पक्षनेते यांना आंदोलनाच्या मागण्यांबाबत सांगितले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही हा विषय मांडू.  करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करून ती विद्यार्थ्यांवर लादली आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती, तर विद्यार्थी खासगी संस्थेत गेले असते.

तरुणांच्या नादी लागू नका…

कसे बोलायचे, कसे वागायचे हे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगणे चुकीचे आहे. प्रशासनाला झुकवण्याची ताकद इथे बसलेल्या प्रत्येक तरुणामध्ये आहे. कोणाच्याही नादी लागा, मात्र तरुणांच्या नादी लागू नका. पुढील काळात वसतिगृह, अभ्यासात, गुणांमध्ये आणि इतर पद्धतीने त्रास दिल्यास सांगा, मग विद्यापीठात आंदोलने कशी करायची हे दाखवून देऊ, असेही पवार यांनी सांगितले.