पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या निधीतून पंढरपूरचे रूपडे पालटेल, असे सांगत माउली व तुकोबांच्या पालखी मार्गावर भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यात येतील, असेही ते म्हणाले.
आमदार विलास लांडे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकर परिचारक आदी उपस्थित होते.
दोन्ही पालखी मार्गावर वारक ऱ्यांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यासाठी आवश्यक दुरुस्ती करावी. पावसापासून बचाव होण्यासाठी निवाऱ्याची सोय करावी, तीर्थक्षेत्रांचा विकास करावा. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा कराव्यात. पालखीतळासाठी जागा ताब्यात द्यावी, गोहत्या बंदी करावी अशा विविध मागण्या वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झाला असला, तरी त्यावरच न थांबता आराखडय़ाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा