राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच भाषण नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त ठरत असते. पुन्हा एकदा कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई

वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले. त्यावेळी असच चर्चेत राहणार भाषण केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकारांना रेकॉर्डिंग करीत उभे होते. छायाचित्रकारांच्या मागे एक महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली.

हेही वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू

त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. इतकंच नव्हे. तर भाषण सुरू असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना देखील बाजूला व्हायचे आदेश दिले. मात्र, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor bhagat singh koshyari said i do not consider myself a governor in pune dpj