पुणे : निर्यात वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून उद्योगांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्राच्या वतीने चाकण औद्योगिक क्षेत्रात शुक्रवारी उद्योजकांशी थेट संवाद साधण्यात आला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने चाकणमधील गॅब्रिएल इंडिया कंपनीत ‘महाराष्ट्र एक्स्पोर्ट कन्वेन्शन २०२४-२५’ ही कार्यशाळा झाली. यावेळी उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, सहविकास आयुक्त मित्तल हिरेमठ, भारतीय टपाल विभागाचे संदीप बटवाल, भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाचे (एफआयईओ) ऋषि मिश्रा, अपेडाच्या सुनिता सावंत, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (ईईपीसी) प्रतापसिंग भद्रा, जिल्हा उद्योग केंद्राच्या सरव्यवस्थापक वृषाली सोने आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> येवलेवाडीत सोफा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात आग लागून कामगाराचा मृत्यू ; शहरात दिवसभरात आगीच्या चार घटना

यावेळी मापारी यांनी उद्योगांना जागा व इतर सवलतींबाबत मार्गदर्शन केले. रजपूत यांनी राज्य शासनाच्या निर्यात धोरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन विविध टप्यावर मदत करण्याचे आवश्वासन दिले. हिरेमठ यांनी विशेष आर्थिक क्षेत्रामधील (एसईझेड) उद्योगांच्या सुविधा व योजनांबाबत मार्गदर्शन केले. पुष्पा गंगावणे यांनी निर्यातीभिमुख उद्योगांच्या सवलती व कार्यपद्धतीबाबत तर बटवाल यांनी टपाल विभागाच्या निर्यातीच्या सेवांबाबत माहिती दिली. एफआयईओचे ऋषि मिश्रा यांनी निर्यातीच्या अनुषंगाने, सुनिता सावंत तसेच प्रतापसिंग भद्रा यांनी कृषी निर्यात सवलती व सुविधांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकरी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र, बँका आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt interact with entrepreneurs to increase exports pune print news stj 05 zws