करोना बाबत महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झालं आहे. इतर देश आणि राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची हर्ड इम्युनिटी जास्त असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर नागरिकांनी कोविड चे नियम पळून साजरा करावा अस आवाहन देखील त्यांनी केलं आहे.  ते पिंपरी- चिंचवडमधील सांगवीतील आरोग्य शिबिरात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, कोविड च संकट पुन्हा घोंगावू लागलं आहे. घाबरून जाण्याच काही कारण नाही. भारतात काय घडतंय, भारताच्या बाहेर काय काय घडतंय यावर आम्ही नजर ठेवून आहोत. रुग्णसंख्या वाढत आहे का? कुठला व्हेरियंट येतोय याची माहिती आहे, त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्राची स्थिती स्ट्रॉंग आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. ९५ टक्के लोकांचं लसीकरण झालेलं आहे. इतर राज्य किंवा इतर देशाशी तुलना केली तर महाराष्ट्रातील लोकांची हर्ड इम्युनिटी चांगली आहे.

बूस्टर डोस सुद्धा ७० टक्के लोकांपर्यंत पोहचला आहे. करोनाचा या लाटेला फेस करण्याची महाराष्ट्राची तयारी झालेली आहे. त्यामुळं कुणीही काळजी करू नका. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर च्या निमित्ताने अनेक जण सुट्ट्यांसाठी बाहेर पडतायत त्यांना एक माफक आवाहन आहे की, सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरून सर्वांनी एन्जॉय करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra health minister tanaji sawant statement on corona outbreak zws 70 kjp