पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्णांची नोंद धुळे जिल्ह्यात झाली असून, पुण्यातही सहा रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

राज्यात १ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा : “पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”

शरीराचे तापमान हे बाहेरील वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. परंतु काही वेळा बाहेरील तापमान वाढते तेव्हा शरीर तेच तापमान कायम राखण्यास सक्षम नसते. त्यामुळे घाम येण्याची यंत्रणा कोलमडून अतिप्रमाणात पाणी शरीराबाहेर उत्सर्जित होऊन भोवळ येते. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा अनेक जणांच्या बाबतीत असेच घडते. यापासून बचाव करण्यासाठी नियमित ३-४ लिटर पाणी प्यावे, सैलसर कपडे घालावेत, भरपूर द्रवपदार्थ प्यावेत. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तेव्हा शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. डोकेदुखी, थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. अक्षय धामणे यांनी सांगितले.

हेही वाचा : अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”

सर्वाधिक रुग्णसंख्या

  • धुळे – २०
  • ठाणे -१९
  • नाशिक – १७
  • वर्धा – १६
  • बुलडाणा – १५
  • सातारा – १४
  • सोलापूर – १३
  • सिंधुदुर्ग – १०