पुणे :  निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर ती संपेपर्यंत राजकारण व्हावे, पण काहीजण ३६५ दिवस राजकारणाकडे धंदा म्हणून बघायला लागले आहेत, असे सांगत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांच्या इव्हेंटवर न बोललेलेच बरे, अशी खोचक प्रतिक्रियाही देत राज्याला आता पुढे नेण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता असल्याचे सामंत यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर आता जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ; परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके, राज्य मंडळाचा निर्णय 

महाटेकतर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिकल, ऑटोमेशन, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, मशीन टूल्स आदी उत्पादनांच्या प्रदर्शनाला सामंत यांनी शुक्रवारी भेट दिली. महाटेकच्या या चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे आणि उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शन मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन व ऑटोमेशन इक्विपमेंट्स, फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीज मधील कॉर्पोरेट्स, लघु आणि मध्यम उद्योगांच्या उपकरणांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

हेही वाचा >>>पुणे : सेक्सटॉर्शन प्रकरणात मोहोळच्या आमदारांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न , राजस्थानातून एकाला अटक

पंतप्रधान एका महिन्यात दोन वेळा मुंबईचा दौरा करत आहेत, ही एक सकारात्मक बाब असून मुंबईतील सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंतप्रधानही आग्रही आहेत. या मुळे भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, अदानी यांच्या कंपन्यांसंदर्भात सध्या जे काही सुरू आहे. त्याचा महाराष्ट्रावर, महाराष्ट्रातील उद्योगांवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यात उद्योग वेगाने वाढत असून राज्य सरकार उद्योगांना सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे.  वेदांता फॉक्सकॉन  कंपनी राज्याबाहेर स्थलांतरीत झाली असली तरी त्यामुळे तयार होणारी इकोसिस्टीम राज्यात तयार होईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.  त्यामुळे त्याचा फायदा राज्याला होणार आहे. कंपनीच्या स्थलांतरामागे शिंदे-फडणवीस सरकारचा कोणताही संबंध नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra industry minister uday samant criticized sanjay raut pune print news apk13 zws