पुणे : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी १९५५-५६ मध्ये सुरू केली. त्यानंतर एवढ्या वर्षांनंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आढळून येत आहेत. राज्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षात २० हजार कुष्ठरुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टापासून राज्य अजूनही खूप दूर असल्याचे चित्र समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांचा विचार करता राज्यातील कुष्ठरुग्णांची संख्या वाढत आहे. कुष्ठरोगाचे राज्यात २०२१-२२ मध्ये १४ हजार ५२० रुग्ण, २०२२-२३ मध्ये १९ हजार ८६० रुग्ण आणि २०२३-२४ मध्ये २० हजार १ रुग्ण आढळले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २०१८-१९ पासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. त्यात सर्व ग्रामीण भाग आणि अतिजोखमीचा ३० टक्के शहरी भाग यात तपासणी मोहीम राबविली जाते. या मोहिमेत राज्यभरात गेल्या वर्षी २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ६ हजार ७४४ कुष्ठरुग्ण आढळून आले.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Take SH 24 vaccine to protect against influenza Directives of Union Health Ministry
वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

हेही वाचा – लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू

कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गेल्या ५ वर्षांत एकही कुष्ठरुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने हाती घेतले होते. त्यात सुमारे २५ हजार गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी २२ हजार ९१६ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ६७६ गावांमध्ये ७९३ नवीन कुष्ठरुग्ण नव्याने आढळून आले. यामुळे निर्मूलन झालेल्या ठिकाणीही कुष्ठरोगाचा प्रसार पुन्हा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा – पुण्यात झिकाचा धोका वाढला! गर्भवतीला संसर्ग; संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू

राज्यातील कुष्ठरुग्ण

२०२१-२२ : १४,५२०

२०२२-२३ : १९,८६०

२०२३-२४ : २०,००१


दहा हजार लोकसंख्येमागे कुष्ठरुग्णांचे प्रमाण

१९८१-८२ : ६२.४०

१९९१-९२ : १४.७०

२०२३-२४ : १.१६


राज्यातील कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सातत्याने मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे जास्तीतजास्त रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधता येत आहेत. हे रुग्ण प्राथमिक अवस्थेतील असल्याने उपचारानंतर ते लवकर बरे होतात. याचबरोबर नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण कमी झाले आहे. – डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)